UPI पिन बदलण्याची सोपी प्रोसेस, अवश्य घ्या जाणून
सर्वात आधी आपल्या फोनवर ते अॅप ओपन करा जे तुम्ही UPI साठी वापरता.
यूपीआय अॅपमध्ये Google Pay, Phonepe, Paytm किंवा तुमच्या बँकेचं कोणतंही यूपीआय अॅप असू शकतं.
आता तुम्ही तुमच्या UPI आयडी, मोबाईल नंबर किंवा अॅपद्वारे मागितलेली कोणत्याही माहितीचा वापर करुन आपल्या अकाउंटमध्ये लॉग इन करा.
लॉग इन केल्यानंतर यूपीआय सर्व्हिस किंवा सेटिंग्सचं सेक्शन शोधा. हे सामान्यतः मेन्यूमध्ये किंवा अॅपच्या एखाद्या वेगळ्या सेक्शनमध्ये असतं.
यूपीआय सर्व्हिस मेन्यूमध्ये 'Change UPI PIN' किंवा 'Reset UPI PIN' चा ऑप्शन शोधा.
यानंतर पुढे जाण्यासाठी तुम्हाला तुमचा सध्याचा यूपीआय पिन टाकावा लागेल.
सध्याचा यूपीआय पिन टाकल्यानंतर तुम्हाला नवा यूपीआय पिन तयार करण्यास सांगितलं जाईल. तुमचा पिन मजबूत आणि सुरक्षित असेल याची खात्री करा.
कन्फर्म करण्यासाठी नवीन यूपीआय पिन पुन्हा टाका.
नवीन पिन टाका आणि कंफर्म केल्यानंतर सबमिट करा.