एक OTP आणि कळेल 6 महिन्यांची कॉल हिस्ट्री, ही ट्रिक नेमकी काय?

अनेकदा आपल्याला फोनची कॉल हिस्ट्री काढायची असते. विशेषतः एखाद्याने कॉल हिस्ट्री डिलीट केली तर हे गरजेचं असतं. अशा वेळी ही ट्रिक कामी येईल.

तसं तर अनेक लोक इंटरनेटची मदत घेतात. पण एखाद्या थर्ट पार्टी अ‍ॅप किंवा वेबसाइटवर जाणं तुम्हाला रिस्कमध्ये टाकू शकतं.

आपण यापेक्षाही चांगल्या पद्धतीविषयी बोलतोय. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या नंबरची 6 महिन्यापर्यंतचं कॉल हिस्ट्री चेक करु शकता. हे फीचर Jio यूझर्ससाठी आहे.

तुम्ही जिओ यूझर असाल तर तुम्ही 6 महिन्यापर्यंत आपली कॉल हिस्ट्री चेक करु शकता. यासाठी तुम्हाला सर्वात आधी My Jio अ‍ॅपवर जावं लागेल.

अ‍ॅ

येथे तुम्हाला अनेक ऑप्शन मिळतील. ज्यात तुम्ही होम स्क्रीनवर दिसत असलेल्या हॅमबर्गर मेन्यूवर क्लिक करावं लागेल. येथे क्लिक करताच तुम्हाला Statement चं ऑप्शन मिळेल.

यावर क्लिक करावं लागेल. येथे क्लिक करताच तुमच्यासमोर अनेक ऑप्शन्स ओपन होतील. येथे तुम्हाला View Statement च्या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल.

यावर क्लिक करताच तुमच्या स्क्रिनवर अनेक डिटेल्स येतील. येथे तुम्हाला Usage Charges ऑप्शनवर करावं लागेल.

आता कॉल हिस्ट्री चेक करण्यासाठी तुम्हाला voice च्या ऑप्शनवर जावं लागेल आणि Click Here वर क्लिक करावं लागेल.

यावर क्लिक करताच तुमच्या स्क्रिनवर त्या नंबरची कॉल हिस्ट्री येईल. अशा प्रकारे तुम्ही सहज त्या नंबरची हिस्ट्री चेक करु शकता.

यासाठी तुम्हाला My Jio अ‍ॅपवर लॉगइन करावं लागेल. ज्यावेळी तुम्ही अ‍ॅपला लॉगइन कराल. तर तुमच्या नंबरवर एक OTP येईल. अशा प्रकारे तुम्ही सहज कॉल हिस्ट्री चेक करु शकता.