संत्र गोड आहे की आंबट बाहेरून कसं ओळखालं?
संत्र हे असं एक फळ आहे जे जवळपास संपूर्ण वर्षभर बाजारात उपलब्ध असत.
हिवाळा हा ऋतू संत्र्यांचा सीजन असल्याने या दिवसात मोठ्या प्रमाणात संत्र्यांची आवक होत असते.
हिवाळ्यात संत्र्याच्या सेवनाचे अनेक फायदे सुद्धा आहेत.
तेव्हा संत्र खरेदी करताना ते गोड आहे की आंबट कसं ओळखावं यासाठी काही टिप्स लक्षात घ्या.
आता घरीच लावा वेलचीचे रोप, वापरा सोपी पद्धत
बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा
संत्र हातात घेऊन हलकेच दाबून पाहा जर ते लगेच दाबले जात नसेल तर ते गोड असते.
संत्र खरेदी करताना त्याचे वजन तपासून पाहा. जर फळ टेनिसबॉल प्रमाणे जड असेल तर ते चवीला गोड असणार.
संत्र खरेदी करताना त्याचा रंग हा गडद आणि चमकदार केशरी असावा.
काहीवेळा संत्र जास्त पिकलं असेल तर त्यांचा रंग हा हिरवट होत जातो.
वरील बाजूस खोलगट तळ असणारे संत्र हे गोड मानले जाते.
ड्राय क्लीनिंगसाठी खर्च होणाऱ्या पैशांची आता होणार बचत
बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा