मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही? घरबसल्या असं करा चेक
देशात लवकरच लोकसभा निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोगाने तारखांची घोषणा केलीये.
अशा वेळी निवडणुकीत मतदान करण्यासाठी वोटर लिस्टमध्ये नाव असणं गरजेचं आहे.
अनेकदा आपण वोट देण्यासाठी बूथवर पोहोचतो, पण लिस्टमध्ये आपलं नावच नसतं.
अशावेळी आपण घरबसल्या पहिलेच नाव चेक करायला हवं. जेणेकरुन ऐनवेळी प्रॉब्लम येणार नाही.
यासाठी सर्वात आधी electoralsearch.eci.gov.in वर जावं लागेल.
यानंतर नवीन वेब पेज ओपन होईल, ज्यात चेक करण्यासाठी तुम्हाला तीन ऑप्शन मिळतील.
पहिला EPIC आहे. या ऑप्शनमध्ये तुम्हाला तुमचा EPIC नंबर आणि स्टेट निवडायचं आहे.
तसंच दुसऱ्या ऑप्शनमध्ये तुम्ही तुमचं राज्य निवडून फोन नंबर टाकून वोटर लिस्टमध्ये नाव चेक करु शकता.
तिसऱ्यात नाव, जन्मतारीख, लोकेशन आणि आपल्या कॉस्टीट्यूएंसी असेंबलीचं नाव टाकून सर्च करावं लागेल.