एसी घरच्या घरी कसा स्वच्छ करावा?  जाणून घ्या टिप्स

सध्या शहरातील बहुतेक घरांमध्ये एसी वापरला जातो.

वातावरणातील उकाडा वाढल्यास एसीमुळे घरात थंड हवा मिळते.

परंतु दररोज एसीचा वापर केल्याने त्याच्या आतल्या भागात धुळीचे कण साचतात. त्यामुळे एसीची थंड हवा आपल्या पर्यंत पोहोचत नाही.

एसी स्वच्छ करायचा असेल तर एका वेळच्या सर्व्हिसिंगसाठी जवळपास 400 ते 1000 रुपयांचा खर्च येतो.

तेव्हा एसी घरच्या घरी स्वच्छ करण्याच्या काही सोप्या टिप्स जाणून घ्या.

सर्वात आधी एसीचा मेन स्वीच बंद करावा.

मग एसीचे वरचे आवरण उघडावे आणि त्यातील फिल्टर जाळ्या काढाव्यात.

फिल्टर जाळीवर अनेकदा धूळ बसलेली असते. तेव्हा ही जाळी स्वच्छ धुवावी.

धुतलेली जाळी वळवण्यासाठी ती उन्हात ठेवावी. मग धुतलेली जाळी पुन्हा एसीमध्ये फिट करावी.

यानंतर एसीतून पुन्हा पूर्वीसारखी थंड हवा येईल.