मोत्याचे दागिने घरच्या घरी कसे स्वच्छ करावे?
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच मोत्याचे दागिने घालायला आवडतात.
परंतु मोत्याच्या दागिन्यांची योग्य काळजी न घेतल्याने ते काळे पडतात आणि त्यांची चमक निघून जाते.
मोत्याचे दागिने हे फार नाजूक असतात त्यामुळे त्यांना साफ करण्यासाठी काही सोप्या टिप्स जाणून घ्या.
मोत्यांचे दागिने हे रासायनिक पदार्थांच्या संपर्कात येऊ देऊ नका.
मोत्यांचे दागिने स्वच्छ करण्यासाठी कापूस किंवा अतिशय मऊ कापड वापरा. तसेच त्याला हलक्या हाताने साफ करा अन्यथा त्यावर चीर पडू शकते.
मोत्याचा हार पाण्यात बुडवू नका. यामुळे रेशमचा धागा निघू शकतो.
कोमट पाण्यात डिशसोप मिक्स करा आणि मुलायम कपड्याने हे पुसून घ्या.
मोत्याच्या दागिन्यांना वर्षातून एकदा पॉलिश करून आणा.
मोत्यांचे दागिने कधीही तुम्ही अल्ट्रासेनिक ज्वेलरी क्लीनरने स्वच्छ करू नका. यामुळे मोती पटकन खराब होण्याची शक्यता असते
मोत्यांचे दागिन्याची स्वच्छता कराल त्यानंतर ते व्यवस्थित सुकू द्या आणि मगच सुरक्षित जागी ठेवा.
मोत्याचे दागिने अन्य धातूच्या दागिन्यांसह ठेऊ नका.
मोत्याचे दागिने लिनन किंवा मुलायम कपड्यांमध्ये गुंडाळून अथवा डबीमध्ये बंदिस्त करून ठेवा