आर्मी कॅन्टीनमध्ये सामान स्वस्त कसं मिळतं?

आपण मॉलमध्ये किंवा डिमार्टमध्ये गेल्यावर बऱ्याच गोष्टी खरेदी करतो. हेच सामान जर तुम्ही आर्मी कॅन्टीन मधून घेतलं तर ते स्वस्त मिळतं.

आर्मी कॅन्टीनमध्ये सामान स्वस्त कसं मिळतं? यामागे काय कारण आहे याविषयी जाणून घेऊया.

आर्मी कॅन्टीनकडून लष्कराच्या जवानांना स्मार्ट कार्ड दिलं जातं.

याचा वापर करुन ते कॅन्टीनमधून हवं ते कमी किंमतीत घेऊ शकतात.

या सुविधा आर्मीतील जवान आणि निवृत्त अधिकाऱ्यांनाच मिळतात. सामान्य लोक याचा लाभ घेऊ शकत नाही.

आर्मीच्या लोकांना दिलं जाणारं कार्ड दोन प्रकारचं असतं.

एक ग्रॉरी कार्ड असतं ज्याच्या वापरानं तुम्ही किराणा, इलेक्ट्रिक सामान खरेदी करु शकता.

दुसरं कार्ड असतं लिकर कार्ड. याच्या मदतीने अल्कोहोल खरेदी करु शकता. मात्र हे कार्ड सामान्य लोकांना मिळत नाही. 

जे लोक आर्मीत असतील त्यांनाच याचा लाभ घेता येतो.