चेहऱ्यावर नॅचरल पिंक ग्लो हवायं? ट्राय करा हे स्किन केअर रुटीन
तुम्ही चेहरा स्वच्छ ठेवलात तर यामुळे त्वचा चांगली राहते आणि चेहरा नैसर्गिकपणे ग्लो करतो.
चेहेऱ्यावर पिंक ग्लो हवा असेल तर तुमच्या डायटमध्ये काही बदल करणे आवश्यक ठरते.
डाएटमध्ये तुम्ही बिट, गाजर, काकडी इत्यादींचे ज्यूस बनून पिवू शकता. याचे रिझल्ट तुम्हाला आठवड्याभरात दिसू लागतील.
यात Beta Keratine आणि प्रोटीन असतात. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्याची त्वचा अधिक सुंदर होऊ लागते.
बीट आणि गाजरचा रस सकाळी रिकाम्या पोटी प्यावा. आठवड्याभरात तुम्हाला त्याचे फायदे दिसू लागतील.
जंक फूड खाणे पूर्णपणे टाळणे पाहिजे. कारण जंक फूडमध्ये ट्रान्स फॅटचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे चेहऱ्याची चमक गायब होते.
जास्त गोड खाणे टाळा. कारण ते चेहऱ्यावर नवीन पेशी तयार होण्यास प्रतिबंध करते आणि नवीन पेशी न तयार झाल्याने चेहरा काळवंडतो.
शारीरिक व्यायाम करा. यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि चेहऱ्यावर चमक येण्यास मदत होते.
सदर मजकूर हा इंटरनेटवर दिलेल्या माहितीच्या आधारे आहे. तेव्हा आहारात बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.