पावसाळ्यात मच्छरांना  कसं पळवला? वापरा घरगुती उपाय

पावसाळ्यात साचलेली दूषित पाणी, अस्वच्छता इत्यादींमुळे मच्छर किंवा डासांची पैदास वाढते.

मच्छर किंवा डासांचा दंशामुळे पावसाळ्यात डेंग्यू मलेरिया सारखे आजार बळावतात.

तेव्हा याऋतूमध्ये घरात येणाऱ्या मच्छरांना पळवून लावण्यासाठी घरगुती उपाय वापरू शकता.

कापूर आणि लवंग एका भांड्यात घेऊन त्याला जाळा आणि घराच्या एका कोपऱ्यात ठेवा. याच्या धुरामुळे मच्छर पळून जातील.

कडुलिंबाच्या तेलात नारळाचे तेल समप्रमाणात मिक्स करून ते शरीरावर लावावे. जेणेकरून डास तुमच्या जवळ येत नाहीत.

लिंबूच्या रसामध्ये आणि लवंगांचे तेल मिक्स मारून ते घरात शिंपडल्याने मच्छर येत नाहीत.

लसूणच्या पाकळ्या पाण्यात उकळून, ते पाणी घरातील कोपऱ्यांमध्ये शिंपडा.

पुदिनाचे पाणी शिंपडल्यावर देखील मच्छर येत नाहीत.

एका भांड्यात तेजपत्ता पेटवून त्याचा धूर करा. याधुरामुळे मच्छर पळून जातात.

संत्र्यांची साल सुकवून त्याला कोळश्यावर ठेवून जाळल्यास मच्छर पळून जातात.