नखांची वाढ वेगाने होत नाही? हे घरगुती उपाय करतील मदत!
बऱ्याच स्त्रियांना लांब नखे आवडतात. परंतु, त्यांची नखे वेगाने वाढत नाहीत.
आज आम्ही तुम्हाला नखं लवकर वाढवण्याच्या काही सोप्या टिप्स सांगत आहोत.
मोहरीचे तेल केवळ केसच नाही तर नखांच्या वाढीसाठीही गुणकारी आहे.
रात्री झोपण्यापूर्वी 5 मिनिटे मोहरीच्या तेलात नखे भिजवा.
अंड्याचा पांढरा भाग दुधात टाका आणि चांगले मिसळा.
त्यात 5 मिनिटे नखे भिजवा. हे आठवड्यातून 2-3 वेळा करा.
बदामाच्या तेलाने मसाज केल्याने नखांमध्ये रक्ताभिसरण वाढते.
दोन बदाम रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी उठल्यावर बदाम खा.
नखे वाढवण्यासाठी हे उपाय प्रभावी ठरू शकतात.
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
क्लिक