किडनी फेल होण्याआधी शरीरात दिसतात 'ही' लक्षणं

धावती जीवनशैली, सकस आहाराची कमतरता, अतिरेकी मद्यपान, चुकीच्या खानपानाची सवय आदींमुळे भारतात किडनीचे आजार असलेल्या रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे.

याच कारणाने सध्या किडनी फेल होण्याच्या प्रकरणात देखील वाढ होत आहे.

परंतु किडनी फेल होण्याआधी शरीरात तुम्हाला विविध लक्षण दिसू लागतात.

किडनी खराब झाली की त्याला क्रॉनिक म्हणतात. मळमळणे, उलटी होणे दम लागणे, भूक ना लागणे, चक्कर येणे, लघवी कमी किंवा जास्त प्रमाणात होणे, डोळ्यांच्या सभोवताली सूज येणे, काम करावस न वाटणे, डोळ्यांच्या आणि पायाच्या भोवती सूज येणे इत्यादी किडनी फेल होण्याची लक्षण आहेत.

किडनी निकामी झाल्यामुळे रुग्णाच्या लघवीच्या रंगात बदल होतो. किडनी निकामी होण्याचे हे प्रमुख लक्षण मानले जाते.

याशिवाय किडनी निकामी होण्याची इतरही अनेक लक्षणं शरीराला जाणवत असतात. ते वेळीच ओळखून त्यावर निदान करणे गरजेचे असते.

शरीरात जाणवणाऱ्या या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांशी संपर्क साधून वेळीच उपाय सुरु करा, असं बी. जे महाविद्यालयाचे डॉक्टर संजीव ठाकूर यांनी सांगितले.

बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर किल्क करा