भेसळयुक्त तूप कसं ओळखावं? जाणून घ्या टिप्स
गायीचे शुद्ध तूप हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते.
तुपामुळे शरीर डिटॉक्स होत आणि शरीराला योग्य पोषण मिळत.
परंतु बाजारात बऱ्याचदा भेसळयुक्त तूप देखील विकले जाते. परंतु काही टिप्स वापरून तुपात भेसळ आणि शुद्ध आहे हे ओळखू शकता.
भेसळयुक्त तुपात वनस्पती तेल, वितळलेले
लोणी, डालडा, हायड्रोजेनेटेड तेल वापरले जाते.
तसेच भेसळयुक्त तुपात बटाटे आणि रताळे कुस्करून टाकण्यात येतात.
शुद्ध तूप ओळखण्यासाठी एका भांड्यात एक चमचा तूप टाका. जर तूप लगेच वितळले आणि त्याला गडद तपकिरी रंग आला म्हणजे ते तूप शुद्ध आहे.
पण जर तूप वितळण्यास वेळ लागत असेल आणि वितळलेल्या तेलाला पिवळा रंग आला तर ते तूप भेसळयुक्त आहे.
पाण्याने भरलेल्या एका ग्लासमध्ये दोन चमचे तूप टाका जर ते तूप पाण्यावर तरंगल तर ते तूप शुद्ध असते.
हातावर शुद्ध तूप घ्या. जर ते तूप लवकर वितळू लागलं तर ते तूप शुद्ध असत.
जर वितळलेले तूप तुम्ही एका जारमध्ये भरून फ्रिजमध्ये ठेवले तर तूप आणि नारळाच्या तेलाचा थर वेगवेगळ्या स्वरूपात जमा झाल्यास ते तूप भेसळयुक्त असते.