सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत. त्यात हिरव्या मटारच्या शेंगा सहज उपलब्ध आहेत.
हिरव्या मटारच्या दाण्यांपासून अतिशय चविष्ट असे भजी बनवता येऊ शकतात. याची रेसिपी वर्धा येथील गृहिणी कुमुद गायकवाड यांनी सांगितली आहे.
साहित्य : 1 वाटी मटार, लांब चिरलेला कांदा, 1 वाटी बेसन, अर्धी वाटी तांदळाचं पीठ लागेल.
याच बरोबर हिरव्या मिरचीची पेस्ट, मीठ, हळद, तिखट, तीळ, ओवा, जिरेपूड आणि तळण्यासाठी तेल हे साहित्य लागेल.
सर्वप्रथम मटार मिक्सर मधून खरबरीत काढून घ्या. एका भांड्यात हे मिश्रण काढून यात चिरलेला कांदा, हिरव्या मिरचीची पेस्ट, हळद, मीठ, तीळ, ओवा, जिरेपूड अॅड करून कडकडीत तेलाचं मोहन घालायचंय.
यात तुम्ही कस्तुरी मेथी आणि मेथीच्या दाण्यांची पूड तसेच कढीपत्ता बारीक करून अॅड करू शकता. हे मिश्रण चांगलं एकत्र करून घ्या.
आता हे मिश्रण तळण्यासाठी तयार आहे. तेल गरम झालं आहे. आता छान भजे तळून घ्या.
कुरकुरीत लालसर होईपर्यंत तळून झाल्यानंतर आता काढून घेऊन गरमागरम भजे सर्व्ह करून घ्या.