तूप गरम झाल्यावर त्यात भगर अॅड करून चांगलं भाजून घ्यायचं आहे.
5 ते 7 मिनिटं भगर तुपात भाजून होईपर्यंत एका साईडने पाक तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी एका छोट्या गंजामध्ये थोडसं पाणी अॅड करून त्यात एक वाटी साखर घालायची आहे.
पाक तयार होण्यासाठी 5 ते 10 मिनिटे लागतील. तोपर्यंत भाजून झालेली भगर एका ताटात थंड होण्यासाठी काढायची.
भगर थंड झाल्यावर साखरेचा तयार केलेला साधा पाक त्यात अॅड करायचा आहे. त्यानंतर चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे.
त्यात ड्रायफ्रूट्स आणि वेलची अॅड करता येईल. आता हे लाडू वळून घ्या आणि सजावट करून तुम्ही त्याला सर्व्ह करू शकता.