गाजर आणि बीटापासून चटणीची सोपी रेसिपी 

गाजर आणि बीट आपल्या शरीरासाठी खाणं अत्यंत चांगलं असतं.

त्यामुळे गाजर आणि बीटापासून चटणी कशी तयार करायची? याची रेसिपी आपल्याला छत्रपती संभाजीनगर मधील गृहिणी मेघना देशपांडे यांनी सांगितली आहे.

एक कप खिसलेले गाजर, पाव कप खिसलेले बीट, सुकी लाल मिरची बियांकाढून, टोमॅटो, लसूण, तेल, जीरे, मोहरी, हिंग, लाल तिखट, हळद, गुळ, मीठ हे साहित्य लागेल.

गॅस वरती एक पॅन ठेवायचा. त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं. तेल गरम झालं की त्यामध्ये गाजराचा खिस टाकून तो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा.

खिसमऊ झाला की त्यामध्ये बीटाचा खिस टाकून त्याचा कच्चे पणा जाईपर्यंत परतून घ्यायचा. नंतर त्यामध्ये लसूण टाकायचा आणि नंतर टोमॅटो टाकायचा.

त्यानंतर चांगलं परतून घ्यायचं. परतून झाल्यानंतर त्यामध्ये लाल मिरच्या टाकायच्या. नंतर हे सगळं मिश्रण एकजीव करून परत एक दोन मिनिटं परतून घ्यायचं.

हे मिश्रण थंड झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ आणि गूळ टाकून हे मिश्रण मिक्सरमधून काढून घ्यायचं.

त्यानंतर हे मिश्रण एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं. नंतर त्याला एक तडका द्यायचा. तडका देण्यासाठी एका पॅनमध्ये तेल घ्यायचं.

अश्या सोप्या पद्धतीने तुम्ही झटपट ही गाजर आणि बीटची चटणी तयार करून तुमच्या घरातील सदस्यांना खाऊ घालू शकता, असं मेघना देशपांडे  सांगतात.

उपवासासाठी असे बनवा भगरीचे लाडू