Recipe : गणरायाला दाखवा चॉकलेट मोदकांचा नैवेद्य! 

सामग्री : 300 ग्रॅम डार्क कंपाऊंड चाॅकलेट, 200 ग्रॅम व्हाईट कंपाऊंड चाॅकलेट, 4 चमचे काजूचे तुकडे, 1 चमचा तुप

डार्क कंपाऊंड चाॅकलेट आणि व्हाईट कंपाऊंड चाॅकलेट बारीक कापून घ्या.

चॉकलेट विटाळावण्यासाठी तुम्ही ओव्हनमध्ये ते 10 सेकंड ठेऊ शकता.

अथवा एका टोपात पाणी गरम करून आणि त्यावर एक काचेचा बाऊल ठेऊन त्यात चॉकलेट टाकून वितळवा.

चाॅकलेट वितळले की ते पायपिंग बॅगमध्ये भरून घ्या, म्हणजे घट्ट होत नाही.

काजूचे तुकडे करून घ्या आणि तुपामध्ये भाजून घ्या. मोदक बनवण्यासाठी सिलिकॉन मोल्ड निवडा.

मोल्डमध्ये व्हाईट किंवा डार्क चॉकलेट भरा. वरून काजूचे दोन तीन तुकडे टाकून पुन्हा त्यावर चॉकलेट टाका.

मोदक मोल्ड दोन तीन वेळा टॅप करून घ्या. जेणेकरून चाॅकलेट  शेवटपर्यंत पोहोचेल.

मोदक मोल्ड फ्रीजमध्ये 15 ते 20 मिनिटे सेट होण्यासाठी ठेवा. मग डिमोल्ड करून मोदक काढावेत.