जुन्या साडीपासून बनवा आकर्षक पायदान

जुन्या साडीपासून बनवा आकर्षक पायदान

घरात जुन्या झालेल्या साड्या टाकून न देता त्यापासूनही आकर्षक वस्तू बनवता येतात.  

वर्धा येथील गृहिणी शोभाताई मकेश्वर आणि सीमाताई आतकरे यांनी जुन्या साडीचं पायदान बनवलंय. 

सर्वप्रथम जुनी साडी घेऊन लांब पट्ट्या फाडून घ्यायच्या आणि त्याचा गोळा बनवून ठेवायचा. 

आता पायदान बनविण्यासाठी खिळे ठोकलेली पाटी घ्यायची व कोपऱ्यापासून सुरुवात करायची. 

खिळ्याला गाठ पाडून समांतर विरुद्ध दिशेच्या खिळ्याला अडकवून पूर्ण पाटी कव्हर करायची आहे. 

उभ्या आणि आडव्या अशा पद्धतीने पूर्ण साडीच्या पट्ट्या पाटीवर अडकवून घ्यायची आहे. 

साडीवर मॅच होणाऱ्या रंगाची लोकर घेऊन बॉल पिन मध्ये अडकवून प्रत्येक चौकोनावर नॉट करायचे.

शेवटी कात्री किंवा धारदार वस्तूने काठ कापून घेतले की जुन्या साडीची पायपुसनी तयार आहे. 

मनी स्टोन वापरा अन् पैशात खेळा

मनी स्टोन वापरा अन् पैशात खेळा