पुरणपोळी हा संपूर्ण महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीमधील महत्त्वाचा पदार्थ आहे.
राज्याच्या प्रत्येक भागात ही बनवण्याची खास पद्धत आहे.
खान्देशात मोठ्या आकाराची पुरणपोळी बनवली जाते. त्याला मांडे असं म्हणतात.
पुरणाचे मांडे नेमके कसे बनवले जातात पाहूया.
प्रथम गव्हाचे पीठ बारीक दळून घ्यावे नंतर कापडाने गाळून घ्यावे.
पिठात मीठ आणि तेल घालून भिजत ठेवावे. डाळ शिजवुन घ्यावी पाणी काढून शिजलेल्या डाळीत गुळ घालून त्याचं पुरण बनवून घ्यावं.
नंतर पिठाचे गोळे करून परातीत बाजरीचे पीठ पसरवून त्यात ठेवावे आणि गोळ्यामध्ये पुरण ठेवून पोळी थोडी लाटून घ्यावी.
नंतर हातावर गोल फिरवून मोठी करावी. खापरावर टाकून शेकावी. मांडे भाजायचे.
त्यांनंतर चांगली शेकली गेली की हळूच काढून चांगले तुप लावुन घडी घालून झाकून ठेवावी.