झटपट तयार करा पाकातली दहीपुरी, रेसिपी पाहा

दहीपुरी हा अनेक विदर्भवासियांचा आवडता पदार्थ. पाकातली दहीपुरी हा पदार्थ अगदी कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनवून तयार होतो.

पाकातली दहीपुरी नेमकी कशी बनवतात याचीच रेसिपी वर्धा येथील गृहिणी अरुणा घोंगडे यांनी सांगितली आहे.

साहित्य : 1 वाटी दही, 1 वाटी रवा, 2 वाटी गव्हाचे पीठ, तळण्यासाठी तेल, वेलची पूड आणि सजावटीसाठी सुकामेवा आवश्यक आहे.

सर्वप्रथम एका भांड्यामध्ये रवा आणि गव्हाचे पीठ घेऊन त्यात चवीनुसार मीठ आणि वेलची पूड अ‍ॅड करून त्यात दही घालायचं आहे. हे दही पूर्ण पिठाला चोळून घ्यायचं आहे.

आता त्यात कडकडीत तुपाचं मोहन घालायचं आहे. त्यानंतर सगळं आता चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे. 

पाण्याच्या साह्याने घट्टसर गोळा भिजवून घ्यायचा आहे. या गोळ्याला दहा मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे.

तो पर्यंत एका कढईमध्ये साखर आणि पाणी अ‍ॅड करून साखरेचा साधा पाक तयार करून घ्यायचा आहे.

 दहा मिनिटांसाठी झाकून ठेवलेला पिठाचा भिजवलेला गोळा घेऊन मोठी जाडसर पोळी लाटून घ्यायची आहे. एका झाकणाने आपल्याला पाहिजे त्या आकाराची पुरी काढून घ्यायची आहे.

या पुऱ्या आता तेलातून सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. आता या पुऱ्या पाकात टाकून लगेच काढून घेऊन दुसऱ्या भांड्यात ठेवायचे आहेत.

काही वेळाने या पुऱ्या छान मुरलेल्या आणि मऊसूत लागतील. पुऱ्या खाण्यासाठी तयार आहेत.

विदर्भातील फेमस मटका रोटी, सोपी रेसिपी