पावापेक्षा सॉफ्ट होतील चपात्या, फक्त 1 काम करा
अनेकजणांना परफेक्ट चपाती बनवणं अवघड वाटतं.
गोल चपाती तर विसराच पण चपातीचे पीठ मळण्यात काही चुका झाल्यास चपात्या कडक होतात.
तेव्हा सॉफ्ट चपात्या बनवण्यासाठी कणिक मळताना काही गोष्टी फॉलो केल्यास चांगले परिणाम दिसू शकतात.
चपातीचे कणिक भिजवताना त्यात 1 ते 2 कप कोमट पाणी टाकावे. तसेच हवे असल्यास तुम्ही यात कोमट तेल देखील घालू शकता.
कणिक नीट मळून झाल की एक सुती कपडा ओला करून तो नीट पिळून घ्यावा आणि मळलेल्या कणकेच्या गोळ्यावर पसरून ठेवावा.
पीठ जवळपास 10 ते 15 मिनिटे झाकून ठेवाव्यात आणि मग चपात्या बनवाव्यात.
पीठ जवळपास 10 ते 15 मिनिटे झाकून ठेवाव्यात आणि मग चपात्या बनवाव्यात.
चपात्या मऊ बनवण्यासाठी तुम्ही यात दही सुद्धा टाकू शकता. परंतु कणिक मळताना यात दहीचा वापर करताना ते दही जास्त आंबट आणि थंड नसावे.
चपात्या मऊ बनवण्यासाठी तुम्ही यात तुपाचा देखील वापर करू शकता.
कणिक मळताना त्यात एक चमचा तूप आणि पाणी मिसळावे. असे करून तुम्ही लगेच चपात्या बनवाल तर तुमच्या चपात्या या मऊ होतील.
दोन ते तीन वाटी गव्हाच्या पिठात चिमूटभर बेकिंग सोडा मिक्स करा मग 1 ते 2 कप दूध आणि पाणी घेऊन कणिक मळून घ्या.
10 ते 15 मिनिटे कणकेचा गोळा झाकून मग त्याच्या चपात्या बनवल्यास त्या मऊ होतात.
एका चिप्सच्या पॅकेटात किती तेल असतं माहितीये?
बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा
बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा