पावसाळ्यात डासांपासून मुलांचं संरक्षण कसं कराल?
पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी साचतं, त्यात चिखल आणि अस्वच्छता यामुळे डासांची पैदास वाढते.
याकाळात सर्वाधिक त्रास हा लहान मुलांना होतो, ज्यामुळे ते आजारी पडण्याची सुद्धा शक्यता असते.
डास चावल्यामुळे मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया असे गंभीर आजार होऊ शकतात.
काही घरगुती उपायांनी घरातले डास घालवणं शक्य होऊ शकतं.
तुळशीचा वास डासांना आवडत नाही. घरातल्या खिडक्या व दारांजवळ तुळशीची रोपं लावू शकता.
तुळशीचा रस मुलांच्या अंगावर लावल्यानंही डास त्यांच्या जवळ फिरकणार नाही.
बाल्कनीमध्ये, कुंड्यांमध्ये पाणी साचणार नाही याची काळजी घ्या म्हणजे डास जास्त येणार नाहीत.
पावसाळ्यात नारळाचं तेल आणि कडुनिंबाचं तेल एकत्र करून ते जाळल्यानं डास घरातून निघून जातात.
नारळ आणि कडुलिंबाच्या तेलांचं हे मिश्रण शरीरावर लावल्यामुळेही डास आपल्या जवळ येत नाहीत.
गवती चहाच्या वासाने डास पळवून जातात.
घरात डास येऊ नयेत म्हणून संध्याकाळी डास येण्याच्या वेळी दारं आणि खिडक्या लावून घ्यावीत.
खिडक्यांना डासांच्या जाळ्या बसवाव्यात. रात्री झोपताना शक्य असेल तर मच्छरदाणी लावून झोपावं.
Healthy Heart साठी कोणतं तेल सर्वोत्तम? माधुरीच्या डॉक्टर नवऱ्यानं सांगितलं