खरी सिल्कची साडी कशी ओळखाल?

साडी खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये गेल्यावर सामान्य ग्राहकांना अस्सल सिल्क व इतर सिल्कमधला फरक लवकर लक्षात येत नाही

तेव्हा ग्राहकांनी फसवणूक टाळण्यासाठी काही टिप्स लक्षात घेतल्या पाहिजेत.

अस्सल सिल्कचं वैशिष्ट्य म्हणजे कापडाचा पोत असतो. कापडाचा पोत ओळखण्यासाठी त्या कापडावरून हलकेच बोटं फिरवा.

अस्सल सिल्क किंवा रेशमाच्या कापडाला हात लावला की चिकट, मुलायम आणि थोडं थंड वाटतं.

कृत्रिम सिल्क असेल तर ते जास्त गुळगुळीत आणि जास्त चिकट लागू शकतं.

पाण्याद्वारे चाचणी - तुमच्या साडीवर पाण्याचा थेंब टाका. अस्सल सिल्क असेल तर तो थेंब हळू हळू शोषला जाईल, पण कृत्रिम सिल्क असेल तर थेंब ओघळून जाईल.

धागे जाळून पाहा – साडीच्या आतल्या भागातील काही धागे घ्या आणि ते जाळा. अस्सल सिल्क असेल तर ते हळूहळू जळेल आणि त्याचा वास केस जळल्याप्रमाणे येईल. त्याची राखही भुकटीसारखी असेल.

 सिंथेटिक सिल्क असेल तर ते जळताना प्लॅस्टिक जळल्यासारखा वास येईल.

पारदर्शकता तपासा –  साडी उजेडासमोर धरा. साडीमधून खूप जास्त प्रकाश आरपार येत असेल तर त्या साडीमध्ये सिंथेटिक सिल्कचा जास्त वापर केलेला असू शकतो.