त्वचेवरील टॅनिंग दूर करण्यासाठी 5 घरगुती उपाय

उन्हामुळे अनेकदा त्वचा टॅन होऊन काळी पडते. एकदा त्वचा टॅन झाली की त्वचेवर चढलेला काळा रंग जाता जात नाही.

अशावेळी महागड्या ट्रीटमेंटपेक्षा घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात.

हळद आणि बेसनाचा पॅक लावून त्वचेचा टॅन सहज निघू शकतो.

दोन चमचे बेसन पीठ घेऊन त्यात अर्धा चमचा हळद, एक मोठा चमचा गुलाबजल आणि दूध व्यवस्थित मिक्स करून घ्या. मग टॅनिंग झालेली त्वचा पाण्याने स्वच्छ करून त्यावर ही पेस्ट लावून घ्या. 10 मिनिटे पेस्ट लावून ठेवा आणि मग धुवून टाका.

त्वचेचे टॅनिंग दूर करण्यासाठी बटाटा उपयोगी ठरू शकतो.

बटाट्यात कॅटेकोलेस नावाचं एंजाइम असतं ज्यामुळे त्वचेचा टोन ब्राईट होण्यास मदत होते. टॅनिंग दूर करण्यासाठी तुम्ही तीन कच्चे बटाटे घेऊन त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट टॅन झालेल्या त्वचेवर लावा यामुळे काही दिवसात त्वचा पुन्हा ब्राईट होते.

टॅनिंग दूर करण्यासाठी तुम्ही दही आणि हळद लावू शकता.

दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स आणि हळदीत असलेले अँटी इंफ्लेमेटरी गुण त्वचेची चमक परत आणण्यासाठी मदत करतात. यासाठी तुम्ही एका वाटीत थंड दही आणि एक चिमूटभर हळद घेऊन मिक्स करा.

दही आणि हळदीची पेस्ट त्वचेवर साधारणपणे 20 मिनिटे लावा. तुम्ही आठवड्यातून दोनदा ही पेस्ट त्वचेवर लावू शकता.

टोमॅटो लाइकोपीनने भरपूर असून हे एक प्रकारे नैसर्गिक सनस्क्रीम आहे.

तुम्ही बाहेरून टॅन होऊन येता तेव्हा लगेचच टोमॅटो कापून ते टॅन झालेल्या त्वचेवर लावल्यास टॅनिंग दूर होण्यास मदत होते.

तुम्ही कच्च्या दुधात हळद आणि लिंबू मिक्स करून नॅचरल टॅन रिमूव्हर तयार करू शकता. याने टॅन झालेल्या जागेवर मसाज केल्याने त्वचेवरील टॅन दूर होते.

सदर मजकूर हा इंटरनेटवर लिहिलेल्या माहितीच्या आधारे आहे. तेव्हा त्वचेवर कोणतीही गोष्ट लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करून घ्या, तसेच डॉक्टरांचा सल्ला देखील घेणे आवश्यक आहे.

बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा