लग्नानंतर काही ठरावीक कालावधीनंतर नवरा बायकोच्या नात्यात दुरावा येऊ लागतो.
कधी यासाठी जोडीदाराच्या चुकीच्या सवयी, भांडण, नात्यांमधील गुंतागुंत, ताणतणाव, आर्थिकबाबी कारणीभूत ठरतात.
तेव्हा नवरा बायकोच्या नात्यात आलेला दुरावा कसा कमी कराल? आणि ते नातं अधिक फुलवण्यासाठी काय करावं याविषयी सांगणार आहोत.
एकमेकांना वेळ द्यावा :
एकमेकांना वेळ द्यावा :
लग्नानंतर कामामुळे एकमेकांना वेळ न देऊ शकल्याने त्यांच्यात दुरावा वाढू लागतो. अशावेळी दोघांनी ठरवून दिवसातील १५ ते २० मिनिट देखील एकमेकांशी संवाद साधावा आणि सुट्टीच्या दिवशी काहीवेळासाठी घराबाहेर पडून वेळ घालवा.
प्रत्येक गोष्टीत दोष शोधू नका :
प्रत्येक गोष्टीत दोष शोधू नका :
अनेकदा जोडीदार प्रत्येक गोष्टीत कुणा एकाचेच दोष शोधू लागला की भांडण होऊन दुरावा निर्माण होतो. अशावेळी जोडीदाराला त्याच्या गुण आणि दोषांसहीत स्वीकारा आणि त्याची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करा.
संयम :
संयम :
नात्यात संयम खूप महत्त्वाचा असतो. जर तुम्ही संयम दाखवला आणि तुमच्या जोडीदाराशी सहानुभूतीने वागलात तर समस्या सुटण्यास मदत होऊ शकते.
मोकळेपणाने बोला :
मोकळेपणाने बोला :
नात्यात संघर्ष वाढत असेल तर या विषयावर तुमच्या जोडीदाराशी मोकळेपणाने आणि प्रामाणिकपणे बोला. तसेच तुमच्या जोडीदाराला काय सांगायचे आहे याकडे लक्ष द्या.
माफी मागा :
माफी मागा :
कोणत्याही नात्यात अहंकार बाळगणे चुकीचे ठरते. तेव्हा तुमच्याकडून कोणतीही चूक झाल्यास प्रामाणिकपणे जोडीदाराची माफी मागा.
सदर माहिती ही इंटरनेटवरून मिळालेल्या मजकुरावर आधारित आहे. याचा न्यूज १८ मराठीशी काही संबंध नाही.