साबुदाण्यात पाणी जास्त झाल्यावर काय करायचं?
साबुदाण्याची खिचडी, वडे इत्यादी खाण्याला बहुतेक खव्वये पसंती देतात.
काहीवेळा साबुदाण्याची खिचडी करण्यासाठी भिजवत ठेवलेल्या साबुदाण्यात पाणी जास्त होत.
यामुळे साबुदाण्याची खिचडी ओलसर होते आणि त्याला चांगले टेक्श्चर येत नाही.
तेव्हा साबुदाण्यात पाणी जास्त झाल्यावर काय करायचं याच्या टिप्स जाणून घेऊयात.
साबुदाण्यात पाणी जास्त झाल्यास साबुदाणा एका चाळणीत काढा.
मग ही चाळणं एका स्टॅण्डवर म्हणजेच जमिनीपासून थोड्या वरच्या अंतरावर अर्धतास निथळत ठेवा.
साबुदाण्यातील जास्तीच पाणी निथळलं गेलं की मग सुती कॉटनच्या कापडावर पसरवून फॅन खाली काहीवेळ सुकवून घ्या.
साबुदाण्यात खूप जास्त पाणी असेल तर साधारण तासभर फॅन खाली पसरवून ठेवा.
दिलेल्या टिप्समुळे साबुदाण्यातील पाणी निघून जाईल आणि खिचडी अतिशय छान होईल.
तुमचाही मेकअप काहीवेळाने पॅची होतो? मग टाळा या 3 चुका
बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा
बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा