कोथिंबीर आठवडाभर ताजी ठेवण्यासाठी  वापरा 4 टिप्स

कोथिंबीर अनेकदा पदार्थांवर गार्निश करण्यासोबत पदार्थांची चव वाढवण्यासाठी देखील उपयोगी ठरते. वापरा 4 टिप्स

तसेच कोथिंबीरीचे आरोग्यासाठी देखील अनेक फायदे आहेत.

तेव्हा कोथिंबिरीची जुडी जास्त काळ ताजी ठेवण्यासाठी या टिप्स फॉलो करा.

प्लास्टिकच्या  पिशवीमध्ये तुम्ही कोथिंबीर जास्त काळ साठवू ठेऊ शकता.

प्लास्टिक झिप लॉक बॅगमध्ये कोथिंबीर ठेवण्यापूर्वी, पिशवीतील ओलावा पूर्णपणे काढून टाका म्हणजे कोथिंबीर लवकर सुकणार नाही.

कोथिंबीर नीट धुवून घ्यावी आणि थेट सूर्यप्रकाश नसलेल्या ठिकाणी सुकविण्यासाठी ठेवा.

सावलीत वाळवल्याने कोथिंबीरमधील पाण्यातील ओलावा दूर होतो. त्यामुळे कोथिंबीर कुजण्याची प्रक्रिया मंदावते.

कोथिंबीर जास्त काळ ताजी ठेवण्यासाठी तुम्ही ती हवाबंद डब्यात ठेवू शकता.

कोथिंबीर जास्त काळ हिरवीगार ठेवण्यासाठी पाण्यात बुडवून ठेवता येते. तुम्हाला फक्त मुळे असलेली कोथिंबीर खरेदी करावी लागेल.

मग एका खोलगट भांड्यात पाणी टाका आणि त्यात कोथिंबीरची मुळे बुडवा. याच्या मदतीने कोथिंबीर रेफ्रिजरेटरच्या बाहेर चार ते पाच दिवस ताजी ठेवता येते.