कोथिंबीर कधीच होणार नाही खराब, अशी करा साठवणूक
अन्न सजावटीसाठीही कोथिंबिर वापरली जाते, शिवाय यामुळे चवही चांगली लागते
पण असं असलं तरी जास्त वेळासाठी कोथिंबि साठवणे सोपे नाही.
कोंथींबिर अगदी एक ते दोन दिवसातच खराब व्हायला सुरुवात होते. अशा वेळी काय करायचं हे महिलांना कळत नाही.
आज आम्ही तुम्हाला त्याची साठवणूक कशी करायची यासाठी काही टीप्स सांगणार आहोत.
बाजारातून कोथिंबीर आणल्यानंतर त्याची मुळे कात्रीने कापावीत.
यानंतर ते स्वच्छ पाण्यात टाकून ठेवावे.
आणि त्याची पाने वरुन फॉइलने बांधा.
असे केल्याने ते बरेच दिवस ताजे राहते.
याशिवाय त्या पाण्यात थोडेसे व्हिनेगरही टाकू शकता. यामुळेही कोथिंबिरची पानं ताजी रहातात.