सुक खोबर वर्षभर साठवण्यासाठी वापरा खास टिप्स
मांसाहार असो वा शाकाहार दोन्ही जेवणात सुक्या खोबऱ्याचा वापर केला जातो. म्हणून गृहिणी घरात सुक्या खोबऱ्याची साठवण करून ठेवतात.
पण काही वेळा साठवण करून ठेवलेलं खोबर देखील खवट आणि काळ पडत.
काळ पडलेलं आणि खवट खोबर चवीला चांगलं लागत नाही.
तेव्हा खोबर वर्षभर कस साठवायचं यासाठी काही टिप्स लक्षात घ्या.
खोबरे एका पिशवीत बांधून हवा बंद डब्यात ठेवावे. तसेच त्याला पाणी लागू नये याची काळजी घ्यावी.
डब्यात खोबर ठेवण्यापूर्वी ते कागदावर पसरवा. मग एका वाटीत पाणी घेऊन त्यात मीठ टाका.
एक कपडा त्या मिठाच्या पाण्यात बुडवून त्याने खोबऱ्याची वाटी आतून बाहेरून पुसून घ्यावी. मग ते खोबर नीट सुकवून घ्यावं.
खोबऱ्याला आतल्या बाजूनी खोबरेल तेल लावावं.
तेल लावलेल्या वाट्या कडक उन्हात वाळवून मगच हवा बंद डब्यात ठेवाव्यात.