जन्माष्टमीला बाळकृष्णाची पूजा कशी करावी?

जन्माष्टमी हा सण भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो.

या दिवशी बाळ गोपाळाचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.

कृष्णाचा जन्म रात्री झाला होता, म्हणून पूजाही रात्री करण्याची परंपरा आहे.

श्रीकृष्णाची उपासना केल्यानं सुख समृद्धी मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

यावर्षी जन्माष्टमी 6 सप्टेंबर रोजी साजरी केली जाणार आहे, या दिवशी उपवास केला जातो.

पूजा करताना श्रीकृष्णाचा पेहराव हिरव्या, पिवळ्या, लाल रंगात असावा. याशिवाय मोरपंखी कपडेही वापरू शकता.

कान्हाला बासरी खूप आवडते. पूजेत कृष्णाला सजवताना हातात बासरी अवश्य ठेवा.

बाळकृष्णाला मोरपिसांचा मुकुट घाला, असे केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

भगवान श्रीकृष्णाला दागिने आवडतात, त्याला विविध आभूषणांनी सजवा चांदीच्या किंवा सोन्याच्या बांगड्या, कानातले आणि कंबरे घाला.

बाळकृष्णाची विधीवत पूजा केल्यानं जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि श्रीकृष्णाची कृपा प्राप्त होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.