वृषभ राशीला सप्टेंबर महिना कसा असेल?
नवा महिना सुरू झाला की पहिल्यांदा राशीचक्रात भविष्य काय आहे हे अनेक जण पाहतात.
त्यामुळे वृषभ राशीच्या मंडळीसाठी सप्टेंबर महिना कसा असणार आहे याबद्दल जाणून ज्योतिषी डॉक्टर प्रियांका कुलकर्णी यांनी माहिती दिली.
या राशीत सूर्य चारुर्थात स्वगृहीचा होऊन पंचमेश बुधासोबत राजयोग करत आहे हा योग्य प्रतिष्ठा सन्मान वाढवणारा आहे.
हे ग्रह तसेच पराक्रम स्थानातील राशिस्वामी शुक्र नवीन संधी आणतील.
पदवीपर्यंत शिक्षण सुरु असलेल्या विद्यार्थ्यांना हा 17 तारखेपर्यंत शुभ काळ आहे.
दशमातील शनी आणि चतुर्थातील सूर्य हे शत्रू ग्रह असून त्यांचच समसप्तक योग होत आहे.
यामुळे नोकरी व्यवसाय आणि व्यक्तिगत आयुष्य यातील जबाबदाऱ्यांमध्ये वृषभ राशीच्या जातकाची कसरत होणार आहे.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
ZP च्या विद्यार्थ्यांना नव्या जगाचं ज्ञान !
Learn more