पती पत्नीच्या वयात लग्नासाठी किती वर्षाचं अंतर असावं?
सध्या लग्नाचे अनेक शुभ मुहूर्त असल्याने अनेक जोडपी लग्नबंधनात अडकत आहेत.
तेव्हा लग्न करताना पती पत्नीच्या वयात नेमकं किती अंतर असावं याविषयी जाणून घेऊयात.
पती पत्नींमधील वयाचा फरक हा अनेक कारणांसाठी महत्वाचा असतो.
परंतु हल्ली लोक वयाचा जास्त विचार करत नाहीत. तर जोडीदार आवडण्याला जास्त महत्व देतात.
वयोमर्यादाच्या बाबतीत सायन्स मात्र काहीतरी वेगळंच सांगत आहे.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार लग्नासाठी मुलाचं वय हे मुलीच्या वयापेक्षा जास्त असावं.
नवरा हा बायकोपेक्षा वयाने 4 ते 6 वर्षांनी मोठा असावा आणि हेच आयडिअल वय असल्याचं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं.
यामागे बायोलॉजिकल आणि सायकोलॉजिकल तर्क लावला गेला आहे, जे खूप रिलिवंट देखील आहे.
महिला पुरुषांपेक्षा वयाच्या 3 ते 4 वर्षांआधीच शरीरीने मॅचुअर होतात. त्यांच्या हॉर्मोन्समुळे वय लवकर वाढू लागलं आणि त्या लवकर वयस्कर देखील दिसतात.
तुलनेत पुरुष वयाच्या उशीरा म्हातारे होतात, यामुळे नवरा-बायकोच्या वयातील फरक हा गरजंच असल्याचं तज्ञ सांगतात.
आयडिअल एज गॅपमुळे नवरा-बायकोमधील आकर्षण टिकून रहातं, त्यांना एकमेकांमध्ये कमी जाणवत नाही, ज्यामुळे त्यांचं नातं जास्त फुलतं.
पुरुषांच्या तुलनेत महिला जास्त लवकर जबाबदार होतात त्यामुळे त्यांच वय पुरुषांपेक्षा कमी असलं तरी त्या आयुष्यातील निर्णय हे समजून उमजून घेऊ शकतात.