लग्नापूर्वी वर-वधूच्या हातावर मेहेंदी का काढतात?

सध्या शुभमुहूर्तावर अनेक जोडपी लग्न बंधनात अडकत आहेत.

लग्नापूर्वी नवं वर- वधूच्या हातावर मेहंदी काढली जाते. परंतु यामागचं नेमकं कारण काय हे जाणून घेऊयात.

मेहंदीला जवळपास सर्वच धर्मांत पवित्र मानलं जातं. लग्न समारंभात तर मेहंदीला विशेष महत्त्व असतं.

भारतात लग्नापासून अनेक धार्मिक प्रसंगी हातांवर मेंदी काढली जाते. हिंदू धर्मात हा सोळा श्रुंगारांचा भाग मानला जातो.

खरं तर ही मेंदी केवळ सौंदर्यातच भर घालत नाही, तर ती अतिशय पवित्रदेखील आहे.

तर वैज्ञानिक कारण असं आहे की, लग्नाच्या वेळी वधू-वरांना अस्वस्थ वाटू लागतं, आयुष्यातील हा सर्वात मोठा टप्पा असल्याने अनेकजण यावेळी घाबरतात.

तेव्हा अशा परिस्थितीत थंडावा देणारी मेंदी लावल्यास शरीराचं तापमान कमी होतं. यासाठी त्यांच्या हाताला आणि पायाला मेंदी लावली जाते.

मेहेंदीला प्रेमाचं प्रतीक देखील मानलं जातं. मेंदीचा रंग जितका लाल तितकं या जोडप्यामध्ये प्रेम वाढत जातं, असंही म्हणतात.

लग्नात काढलेल्या मेंदीचा रंग जेवढे जास्त दिवस टिकून राहील, तेवढंच ते नवीन जोडप्यांसाठी शुभ मानलं जात.