भारतात लग्न सोहोळ्याच्या विविध पद्धती आहेत. प्रत्येक पद्धतीमध्ये वेगवेगळ्या प्रथा परंपरा असतात.
हिंदू लग्नांमध्ये नवी नवरी गृहप्रवेशाच्या वेळी धान्याने भरलेले माप ओलांडून सासरच्या घरी प्रवेश करते.
परंतु या प्रथेमागचं नेमकं कारण काय? गृहप्रवेश करताना माप का ओलांडल जात हे जाणून घेऊयात.
Quora या साईटवर देखील असाच प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. यावर लोकांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
अरुण नारायण सबनीस या यूझरने लिहिले की, विवाह होऊन घरी येणारी नववधू ही लक्ष्मी चे स्वरूप असते असे आपल्याकडे परंपरेने मानले जाते.
तसेच पूर्वीच्या काळी घरात धनधान्याची समृद्धी असणे हेच भरपूर सुखाचे मोजमाप होते.
तेव्हां अशा धनधान्याने गच्च भरलेले माप ओलांडणे किंवा त्याला उलथवून मापातले धान्य उंबऱ्याच्या आत घरात पसरवून टाकणे म्हणजे नव्या गृहलक्ष्मीने स्वतःच्या शुभ पावलांनी आपले घर समृद्धीने भरून टाकणे अशी कल्पना होती.