विवाहित महिला हिरव्या बांगड्या का घालतात?

18 जुलैपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. या दरम्यान हिरव्या बांगड्या घालण्याला फार महत्व असते.

 श्रावण महिन्यात हिरव्या रंगाला अतिशय महत्व असून हिंदू धर्मानुसार यादिवसात हिरव्या रंगाची वस्तू जवळ ठेवणे किंवा घालणे शुभ मानले जाते.

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार हिरवा रंग हा बुध ग्रहाशी जोडला गेला आहे. 

या काळात हिरव्या रंगाची कोणतीही वस्तू जवळ ठेवल्यास बुध ग्रह प्रसन्न होतो.

श्रावण हे हिरवगार निसर्गाचं प्रतीक असल्याने श्रावणात हिरव्या बांगड्या घालण्याला विशेष महत्व असते.

हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्याने सकारात्मक  ऊर्जा मिळते. 

काचेच्या हिरव्या बांगड्यांच्या आवाजाने नकारात्मकता दूर होते असे म्हणतात.

श्रावणात हिरव्या बांगड्या घालून शंकराची पूजा केल्यास अतिशय लाभ मिळतो अशी श्रद्धाळुंची भावना असते.

हिरवा रंग शंकर आणि पार्वतीला प्रिय आहे. तेव्हा श्रावणात हिरव्या बांगड्या घालून त्यांची पूजा केल्याने देवता आपल्यावर  प्रसन्न होतात.