भारतातील मेघालयमध्ये कोंगथोंग गाव आहे. याठिकाणा 650 लोक राहतात.
येथील लोकांना त्यांच्या नावासोबत खास गाणी दिली जातात.
याच कारणामुळे या गावाला व्हिसलिंग व्हिलेज असंही म्हटलं जातं.
या गावातील लोकांची नावे सामान्य लोकांसारखीच असतात मात्र ते फक्त अधिकृत कामांसाठी याचा वापर करतात.
लोकांच्या नावासोबत त्यांच्यासाठी एक खास धूनही तयार केली जाते.
मुल जन्माला येताच आई-वडिला त्यांच्यासाठी खास धून तयार करतात.
तयार केलेली गाणी मुलांच्या नावासोबत जोडलेली असतात.
येथील लोक गाण्यांच्या नावानेच ओळखली जातात.
मेघालयामध्ये या गाण्याला झिंगरावई म्हणतात. याचा अर्थ आजीचं गाणं.