रक्त ही एकमेव गोष्ट आहे, जी आपल्या शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यात ऑक्सिजन आणि आवश्यक पोषक तत्वं पोहोचवतं
तिथून कार्बन डायऑक्साइड आणि इतर प्रकारच्या अशुद्धता काढून टाकतं.
रक्त नसलेली एकही व्यक्ती नसली तरी अनेकदा शरीरात रक्ताची कमतरता असते.
प्रौढ माणसाच्या शरीरात 5 ते 6 लिटर रक्त असायला हवं
जर तुम्हालाही रक्ताची कमतरता असेल तर काही ज्यूसचं सेवन नक्की करा.
डाळिंबाचा ज्यूस - डाळिंबात पुरेशा प्रमाणात लोह आणि व्हिटॅमिन सी असते.
या गोष्टी रक्तातील हिमोग्लोबिन वाढवतात आणि यामुळे कमजोरी आणि थकवा दूर होतो
बीटरूटचा रस - यामध्ये फोलेट, मॅग्नेशियम, पोटॅशियम, बीटेन आणि व्हिटॅमिन सी असतं.
बीटरूट रक्तातील लाल रक्तपेशींना जास्तीत जास्त ऑक्सिजनचा वापर करण्यास सक्षम करतं.
पालेभाज्यांचा रस - हिरव्या भाज्यांचं सेवन केल्यानं शरीरातील रक्ताचं प्रमाण वाढतं.
यात तुम्ही पालक, बीटरूट, लिंबू, द्राक्ष, संत्री इत्यादी देखील घालू शकता.
लोहासोबतच फॉलिक अॅसिड, व्हिटॅमिन सी, फोलेट, कॉपर आणि व्हिटॅमिन ए देखील हिरव्या रसामध्ये आढळतात