लोकसभा निवडणूक जिंकणारे भारतीय क्रिकेटर्स

भारतात सध्या दोन गोष्टींची धूम सुरु आहे. एक म्हणजे निवडणूक तर दुसर म्हणजे क्रिकेट  

टीम इंडियासाठी खेळलेल्या अनेक स्टार क्रिकेटर्सनी यापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीत उभ राहून विजय देखील मिळवलेला आहे.

गौतम गंभीर हा एकमेव भारतीय क्रिकेटर आहे जो वर्ल्ड कप विजेत्या टीमचा सदस्य होता आणि त्याने लोकसभा निवडणूक देखील जिंकली.

गौतम गंभीरने भाजपच्या तिकिटावर 2019 मध्ये निवडणूक लढवली आणि तो पूर्व दिल्लीतून खासदार म्हणून निवडून देखील आला.

क्रिकेटर नवजोत सिंह सिद्धू यांनी देखील तब्बल 2004, 2007 आणि  2009 मध्ये लोकसभा निवडणूक जिंकली होती.

भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीनने 2009 मध्ये मुरादाबाद येथून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि तो ते त्यात विजयी देखील झाले.

1983 च्या वर्ल्ड कपमध्ये कपिल देवच्या टीमचा महत्वाचा भाग असणारे माजी क्रिकेटर कीर्ति आजाद यांनी 1999 मध्ये दरभंगा येथून भाजपाचाय तिकिटावर निवडणूक लढवली. या निवडणुकीत ते विजयी देखील झाले.

दिवंगत माजी क्रिकेटर चेतन चौहान हे अमरोहा येथून भाजपच्या तिकिटावर तब्बल दोन वेळा लोकसभेवर निवडून गेले होते.