'या' भारतीय खेळाडुंच्या नावावर आहेत सर्वात जास्त वर्ल्डकप खेळण्याचा रेकॉर्ड
यावेळी भारतात ICC वनडे वर्ल्ड कपचं आयोजन केलं जात आहे.
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली चौथा विश्वचषक खेळणार आहे.
भारताचे आणखी चार खेळाडू तिसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषकात सहभागी होणार आहेत.
सचिन तेंडुलकरने भारतासाठी सर्वाधिक एकदिवसीय विश्वचषक खेळला आहे.
महान फलंदाज सचिन तेंडुलकरने 6 एकदिवसीय वर्ल्डकप खेळला आहे.
2011 मध्ये त्याला ही ट्रॉफी उचलण्याची संधी मिळाली.
2011 चा विश्वचषक जिंकवून देणारा कर्णधार एमएस धोनीने आत्तापर्यंत 4 वर्ल्डकप खेळले आहेत.
विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव, सुनील गावस्कर यांनीही ४ वर्ल्डकप खेळले.
भारतीय कर्णधार रोहित शर्मा तिसऱ्यांदा एकदिवसीय वर्ल्डकप खेळणार आहे.