3 फुटाच्या देशी गाईचं दूध 300 रुपये लिटर

3 फुटाच्या देशी गाईचं दूध 300 रुपये लिटर

सध्याच्या काळात अधिक दूध मिळवण्यासाठी जर्सी किंवा इतर परदेशी जातींच्या गाई पाळल्या जातात. 

तरीही जगात उंचीला सर्वात लहान असणारी देशी पुंगनूर गाय सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरतेय. 

सातारा जिल्ह्यातील कराडच्या कृषी प्रदर्शनात या गाईला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली. 

पुंगनूर ही भारतीय वंशाची गायची प्रजाती जगातील सर्वात लहान असून ती 2 ते 3 फूट उंचीची असते. 

पांढरा, काळा, तांबडा अशा रंगांमध्ये आढळणाऱ्या या गाईचे पाय अखूड असतात. 

120 ते 200 किलोपर्यंत वजन असणाऱ्या या गाईची शेपटी जमिनीला टेकेल एवढे असते.

या गाईंचा आहार कमी असतो आणि ही गाय एका वेळी दोन ते तीन लिटर दूध देते. 

दुधाचे फॅट जास्त प्रमाणात भरते आणि प्रति लिटर 300 रुपये प्रमाणे ते बाजारात विकले जाते. 

प्रामुख्याने हैद्राबात आणि चेन्नई, तिरुपती परिसरात आढळणाऱ्या गाईची किंमत 2 ते 5 लाखांपर्यंत असते. 

बैलाच्या किमतीती येईल मर्सिडीज