'या' ठिकाणी मेलेल्या जीवापासून करतात नशा!
लोक दारु, ड्रग्ज, गांजा, भांग, सापाचं विष अशा वेगवेगळ्या गोष्टी करुन नशा करतात.
दिवसेंदिवस तरुणाईमध्ये या गोष्टींचं क्रेझ वाढताना दिसत आहे.
या सर्व गोष्टी नशेसाठी वापरतात हे तर तुम्हाला माहितीय मात्र पाकिस्तानमध्ये तर प्राण्यांपासूनही नशा केली जाते.
पाकिस्तानमध्ये दारु पिण्यावर बंदी आहे. यामुळे लोक वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करुन नशा करतात.
ते विंचूपासून नशा करतात. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल मात्र हे खरं आहे.
ड डॉनच्या रिपोर्टनुसार, खैबर पख्तूनख्वाच्या लोकांनी नशा करण्याचा नवा उपाय शोधून काढला आहे.
नशा करण्यासाठी ते पहिल्यांदा मेलेल्या विंचूना सुकवतात. त्यांना विस्तवावर टाकून त्याच्या धुरापासून नशा करतात.
नशा करण्यासाठी खास प्रकारचे विंचू घेतले जातात. विशेषतः त्यांच्या विंचूच्या शेपट्यांची जास्त डिमांड आहे.
अनेक प्रकारे नशा केली जाऊ शकते. मात्र सतत नशा केल्यामुळे स्मरणशक्तीची समस्या होऊ शकते.