चहा स्टॉलनं बदललं नशीब; आता लाखोंची कमाई 

दिवसभर कोणत्याही वेळी आवडीनं पिले जाणारे पेय म्हणजे चहा. चहा प्रत्येकाला त्याच्या वेळेला लागतोच.

त्यामुळे चहाप्रेमींची ही आवड लक्षात घेऊन आता अनेक शहरांमध्ये वेगवेगळे खास स्टॉल सुरू झालेत.

जालना शहरात देखील सध्या एक स्टॉल सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

जालना शहरातील छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर ग्रॅज्युवेट टी स्टॉल आहे.

जगन्नाथ आघाव यांचा हा स्टॉल आहे. बुलडाणा जिल्ह्यातल्या लोणार हे त्यांचं मुळ गाव आहे.

ते शिक्षण झाल्यानंतर नोकरी करत होते. पण, त्यामध्ये त्यांना स्थिरता मिळाली नाही.

त्यानंतर त्यांनी हा चहाचा स्टॉल सुरू केला आणि त्यांचं नशीब बदललंय.

आता लाखोंची कमाई ते करत आहेत.

नाशिकमधील टॉप 3 मिसळ एकदा ट्राय कराच