दुग्धजन्य पदार्थांतून तरुणाची लाखोंची कमाई

बेरोजगारी हा देशातील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांपैकी एक मुद्दा.

अनेक तरुण हाताला काम नाही म्हणून हताश झाल्याचे आपण आपल्या आजूबाजूला पाहतो.

मात्र, जालना जिल्ह्यातील एका तरुणाने बेरोजगारीवर मात करत स्वतःचा व्यवसाय उभारलाय.

जिल्ह्यातील वाटुरचे रहिवासी असलेले अनिल मुळे शिक्षण झाल्यानंतर अनेक दिवस बेरोजगार होते. त्यामुळे मिळेल ते काम त्यांनी केले.

 जेसीबी ड्रायव्हर म्हणून काम तसेच कापूस खरेदीचा व्यवसाय देखील करून पाहिला मात्र कोणत्याच व्यवसायात यश न आल्याने त्यांनी दुधावर प्रक्रिया करण्याचा उद्योग सुरू केला.

दुधापासून पनीर, श्रीखंड, लस्सी, ताक इत्यादी पदार्थ निर्माण करून त्यांनी विश्वास नावाचा स्वतःचा ब्रँड तयार केला आहे.

यातून त्यांना लाखोंची कमाई होत आहे.

एक निर्णय अन् एकरात 3 लाखांचं उत्पन्न