बांधकाम मजुराच्या मुलाला 49 लाखांचं पॅकेज!

बांधकाम मजुराच्या मुलाला 49 लाखांचं पॅकेज!

जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर कितीही अशक्यप्राय वाटणारं यश खेचून आणता येतं. 

जालना जिल्ह्यातील परतुर येथील बांधकाम कामगाराच्या मुलानं हेच सिद्ध करून दाखवलंय. 

झोपडपट्टीत राहणाऱ्या अंबादास म्हस्के यानं आई वडिलांच्या कष्टाचं पांग फेडलंय. 

जपानमधील एका आंतरराष्ट्रीय कंपनीत डेटा अनॅलिस्ट म्हणून अंबादासला नोकरी मिळालीय. 

विशेष म्हणजे अंबादासला जपानच्या होंडा कंपनीत वार्षिक 49 लाखांचं पॅकेज मिळालंय. 

आयआयटी मुंबईच्या पदवीदान समारंभात नुकत्याच त्याचा सन्मान करण्यात आला. 

एम.टेक 'तंत्रज्ञान आणि विकास' या विषयात त्याने सरस कामगिरी करत रजत पदक मिळविले आहे. 

म्हस्के कुटुंब परतूर शहरातल्या इंदिरा नगर भागात एका पत्र्याच्या घरात राहतं.

अंबादासचे आई वडील दोघेही मुंबई येथे बांधकाम मजूर म्हणून काम करतात. 

भाजीपाल्याच्या क्रेटवर फळ्या टाकून त्याचा टेबल म्हणून अंबादासने अभ्यासासाठी वापर केला. 

संगीत विश्वातील दुर्मिळ खजिना!