कडू कारल्याच्या शेतीतून शेतकरी लखपती!

कडू कारल्याच्या शेतीतून शेतकरी लखपती!

कारलं म्हटलं की, अनेकजण नाक-तोंड मुरडतात. परंतु ते चवीला कडू असलं तरी आरोग्यासाठी प्रचंड उपयुक्त असतं.

याच कडू पौष्टिक कारल्याच्या लागवडीतून  जालना जिल्ह्यातील दहिफळ गावचे रहिवासी दत्तात्रय काळेदत्तात्रय काळे यांनी 2 लाखांचं उत्पन्न मिळवलंय.

 त्यांनी या शेतीचं नियोजन नेमकं कसं केलं, पाहूया.

दत्तात्रय यांनी युएस-33 नावाच्या कारले जातीची 1 एकर क्षेत्रात 4 बाय अडीच फुटांवर लागवड केली. त्याआधी ठिबक सिंचन आणि मल्चिंग पेपर अंथरून घेतलं.

त्यामुळे पाण्याचं सूक्ष्म नियोजन करणं त्यांना शक्य झालं. खत आणि कीटकनाशकांचं योग्य नियोजन केल्यानं अवघ्या अडीच महिन्यांमध्ये कारल्याचा पहिला तोडा निघाला.

त्यातून 3 ते 4 क्विंटल कारले मिळाले. मग उत्पन्नात आणखी भर पडली. आता दर चौथ्या दिवशी त्यांच्या शेतातून 10 क्विंटल कारले छत्रपती संभाजी नगरच्या मार्केटमध्ये पोहोचवले जातात.

मार्केटमध्ये या कारल्यांना 35 ते 40 रुपये प्रति किलोचा भाव मिळतो. आतापर्यंत त्यांनी 8 ते 10 टन कारल्यांची विक्री केली.

त्यातून त्यांना अडीच ते 3 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं असून 2 लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. तसंच आणखी 2 लाखांचा निव्वळ नफा या क्षेत्रातून अपेक्षित असल्याचं दत्तात्रय काळे यांनी सांगितलं.

उन्हाळ्यात 'ही' 4 पिकं घ्या, शेतात उगवेल सोनं