चक्क पाण्याच्या प्रवाहात वाळूचं शिवलिंग

चक्क पाण्याच्या प्रवाहात वाळूचं शिवलिंग

आपल्या देशात देवी देवतांची असंख्य मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिराचं काही ना काही वेगळेपण असतं. 

जालना शहरापासून अवघ्या काही अंतरावर कणकणेश्वर महादेव मंदिर आहे. 

अतिशय निसर्गरम्य परिसरात छोटंसं पण तितकंच देखणं मंदिर भाविकांना आपल्याकडे खेचून घेत आहे. 

पाण्याच्या प्रवाहात वाळूपासून शिवलिंग तयार होत असल्याने याला वाळूचा महादेव असं म्हटलं जातं.

कणकणेश्वर महादेव मंदिरातील शिवलिंग स्वयंभू असल्याने येथे नेहमीच भाविकांची गर्दी असते. 

जालना शहरातील हिरालाल शेंडीवाले हे पुजारी वयाच्या अवघ्या दहा वर्षापासून येथे सेवा करतात. 

श्रावण महिन्यामध्ये इथे भाविकांची गर्दी असते. दर सोमवारी इथे महाप्रसादाचं आयोजन केलं जातं.

जगातील सर्वात वजनदार गणपती