मल्चिंग, ठिबकद्वारे पाण्याचे नियोजन करून टरबूज लागवड केली. दोन किलोपासून सहा किलोपर्यंत वजनाचे टरबूज आले. त्यामुळे विक्रमी 25 टन टरबुजाचे उत्पादन मिळाले, असे आटोळे यांनी सांगितले.
टरबूज शेतीतून 14 टनाला 9.50 रुपये प्रतिकिलोप्रमाणे 1 लाख 25 हजार रुपये एवढे उत्पन्न मिळाले. तर 10 टनाला 7 रुपये किलोप्रमाणे 70 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले.
एकूण 1 लाख 95 हजार रुपये या शेतीतून मिळाले. यामध्ये 35 हजार रुपये खर्च सोडता निव्वळ एक लाख साठ हजारांचा नफा त्यांना झाला आहे.
तर एकूण तीन एकर क्षेत्रावर साडेचार ते पाच लाख रुपयांचे उत्पन्न होईल, अशी अपेक्षा आटोळे यांना आहे.