पारंपरिक शेतीच्या तुलनेत रेशीम शेती फायदेशीर ठरत असल्याने रेशीम शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढतोय.
जालना जिल्ह्यामध्ये रेशीम शेतीसाठी आवश्यक असणारे मार्केट तसेच इतर पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.
घनसावंगी तालुक्यातील भानुसे बोरगावेच शेतकरी भागवत भानुसे यांची अशीच यशोगाथा आहे.
याआधी ते सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद अशी मराठवाड्यात घेतली जाणारी पारंपारिक पिके घ्यायचे.
मात्र 2018 मध्ये त्यांना रेशीम शेती विषयी माहिती मिळाली. यानंतर त्यांनी एक एकरापासून रेशीम शेती लागवडीस सुरुवात केली.
रेशीम शेतीमध्ये फायदा दिसत असल्याने हळूहळू त्यांनी रेशीम शेती वाढवत नेली.
यातून त्यांना वर्षाकाठी 10 ते 12 लाखांचे उत्पादन सहज मिळत आहे.