आपल्या देशातील बहुतांश जनता ही शेती व्यवसायावर अवलंबून आहे. मात्र दुष्काळ, बाजारभावाचे गणित आणि निसर्गातील असमतोल यामुळे शेती हा घाट्याचा सौदा ठरत आहे.
मात्र अनेक शेतकरी पारंपारिक पिकांना फाटा देऊन वेगवेगळी पिके घेऊन शेती फायदेशीर ठरवत आहेत.
जालना जिल्ह्यातील मार्डी येथील शेतकरी दत्ता राऊत यांनी देखील अशीच किमया केली आहे. केवळ सव्वा एकर क्षेत्रावर चिकू शेती फुलवून त्यांनी तब्बल 3 लाखांचे उत्पन्न मिळवले.