230 झाडांतून शेतकरी लखपती!

पारंपारिक पिकांना फाटा देऊन शेतकरी आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग करत असतात. याच प्रयोगाचा भाग म्हणून अनेक शेतकरी रेशीम शेतीकडे वळले आहेत.

अनेक जण सफरचंदाची लागवड, अँपल बोरांची लागवड, पॅशन फ्रुटची लागवड, ड्रॅगन फ्रुटची लागवड अशा विविध फळबाग फळ पिकांची शेती करत आहेत.

जालना जिल्ह्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली येथील एका युवा शेतकऱ्याने अंजीर पिकाची लागवड करून पहिल्याच वर्षी एक ते दीड लाखांचं उत्पन्न घेतलं आहे.

या शेतकऱ्याचे नाव राहुल खोसे आहे. विशेष म्हणजे या फळांची विक्री व्यवस्थापन देखील त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने केले आहे.

असं केलं व्यवस्थापन : अंजीर शेतीचा प्रयोग शेतकऱ्यांसाठी आर्थिक समृध्दीचा नवा मार्ग दाखवणारा ठरत आहे. 2021 मध्ये खोसे यांनी अंजीर लागवडीचा निर्णय घेतला.

त्यासाठी 230 रोपांची 12 बाय 15 असे एक एकरमध्ये रोपांची लागवड केली. यासाठी त्यांनी सर्वप्रथम जेसीबीने 12 बाय 15 अंतरावर खड्डे खोदले.

त्यामध्ये पाला- पाचोळा आणि कुजलेले शेणखत वापरून झाडांची लागवड केली. त्यासोबतच उनीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी त्यामध्ये चापमीठ घालण्यात आले.

सुरुवातीला खताची मात्रा 10 किलो शेणखत, 10 किलो लेंडीखत, 5 किलो गांडूळ खत अशी ठेवण्यात आली होती. यासाठी त्यांना 60 हजार ते 70 हजारांपर्यंत खर्च आला.

कृषीतज्ज्ञांचा सल्ला घेत अंजीर शेती जोपासली, अंजीर पिकामध्ये सुरुवातीचे दोन वर्ष सोयाबीन आंतरपीक घेऊन घरखर्च भागवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. 

राहुल खोसे यांना अंजीराच्या रोपांचे व्यवस्थित व्यवस्थापन केल्याने आता यातून उत्पन मिळण्यास सुरुवात झाली आहे.

चक्क एकाच झाडाला 205 पपई!