तुती लागवडीतून शेतकरी असा झाला लखपती

लहरी निसर्ग बाजारभावातील चढ-उतार आणि सरकारी धोरणे या सगळ्यांचाच फटका शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणावर बसत असतो.

त्यामुळे पारंपारिक पिके घेऊन शेती करणे तोट्याचा सौदा होऊ लागलाय.

यामुळेच अनेक शेतकरी आपल्या शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग करून शेतीमधून चांगले आर्थिक उत्पन्न घेत आहे.

असाच प्रयोग जालना जिल्ह्यातील भानुसे बोरगाव येथील एका शेतकऱ्याने केलाय.

रेशीम शेती मधून या शेतकऱ्याने अवघ्या दोन एकरात वर्षभरात तब्बल सात लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळवले.

जालना जिल्ह्यातील भानुसे बोरगाव येथील रहिवासी असलेले शरद भानुसे ही रेशीम लागवड करण्यापूर्वी पारंपारिक पिकांची शेती करायचे.

त्यांच्या शेतामध्ये कापूस, तूर, सोयाबीन इत्यादी नेहमीची पिके असायची. मात्र या पिकांमधून त्यांना फारसी उत्पादन होत नसे.

त्यामुळे त्यांनी नवीन काहीतरी करण्याचे ठरवले. 2018 मध्ये त्यांनी इतर शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एक एकर तुती लागवड करण्याचा निर्णय घेतला.

पहिल्याच वर्षी चांगले आर्थिक उत्पन्न मिळाल्याने त्यांनी आणखी एक एकर क्षेत्रावर तुतीची लागवड केली.

यामुळे त्यांना आता दरवर्षी सात ते आठ लाखांचं निव्वळ उत्पादन रेशीम शेती मधून होत आहे.

दुग्धजन्य पदार्थांतून तरुणाची लाखोंची कमाई